इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत सहयोगी बैंकिंग क्षेत्रात १५५७ लिपिक (Clerk) पदांची भरती - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Friday 4 September 2020

इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत सहयोगी बैंकिंग क्षेत्रात १५५७ लिपिक (Clerk) पदांची भरती


इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत सहयोगी बैंकिंग क्षेत्रात १५५७ लिपिक (Clerk) पदांची भरती ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३/०९/२०२०  
संस्था / विभागाचे नाव इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग
 पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)
पदनाम लिपिक (Clerk)
एकूण पदांची संख्या १५५७
अर्ज सुरु होण्याचा
 दिनांक
०२/०९/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३/०९/२०२०
अर्जाचे स्वरूप  ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन पूर्व + मुख्य परीक्षा 
नियुक्तीचे ठिकाण सहभागी बैकिंग क्षेत्र (संपूर्ण भारत)
परीक्षेचे ठिकाण पूर्व परीक्षा - अमरावती,
औरंगाबाद,चंद्रपूर,जळगाव,
कोल्हापूर,लातूर,मुंबई,
ठाणे, नवी मुंबई,
नागपूर,
नांदेड,नाशिक, पुणे, रत्नागिरी,सोलापूर
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
लिपिक (Clerk) १५५७ फक्त महाराष्ट्रातील:-
खुला(open)-१५१

इ.मा.(obc)-८८

अ.जा.(sc)-३४

अ.ज.(st)-२८
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
लिपिक (Clerk)
कोणत्याही शाखेतील पदवी मान्यताप्राप्त 
विद्यापीठ किंवा 
समकक्ष + संगणकाचे ज्ञान 
---
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग  Reserved)
लिपिक (Clerk)
२८ वर्ष
इ.मा.(३ वर्ष_३१ वर्ष)

अ.जा./अ.ज (५वर्ष_३३ वर्ष)
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
खुला (open) 850 ₹
इ.मा (obc) 850 ₹
अ.जा./अ.ज. (sc/st) 175 ₹
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा 

 ऑनलाईन अर्ज करण्याची पूर्वतयारी:

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी- 

१)उमेदवारांनी त्यांचे अलीकडील काळातील छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठा स्कॅन करून घ्यावा.

२)आवश्यक माहितीचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी आवश्यक तपशील / कागदपत्रे सोबत ठेवावी.

३)उमेदवाराकडे एक वैध वैयक्तिक ईमेल (Email)आयडी असावा, जो या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर होईपर्यंत सक्रिय ठेवलेला असावा.

ऑनलाईन अर्ज कसा करावा-

१)उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर www.ibps.in जाणे आवश्यक आहे.

२)उमेदवारांना “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” Click here to Register या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑनलाईन अर्जामध्ये त्यांची मूलभूत माहिती देऊन त्यांचा अर्ज नोंदविण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करावी.

३)उमेदवाराने प्राप्त झालेला तात्पुरता नोंदणी क्रमांक Registration number आणि संकेतशब्द Password नोंदवावा/जतन करून ठेवावा.उमेदवारांना नोंदणी क्रमांक (Registration number)आणि (Password) संकेतशब्द दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल. उमेदवार तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द वापरुन जतन केलेला डेटा पुन्हा उघडू शकतात आणि आवश्यक असल्यास तपशील संपादित करू शकतात.

४)उमेदवारांनी त्यांचे स्कॅन केलेले छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.

५)ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक आपली अचूक माहिती अर्जा मध्ये नमूद करणे आवश्यक आहे कारण कोणतीही चुकीची माहिती अर्जदाराने नोंदविली आहे असे आढळल्यास निवडप्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात आपला अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

६)“Make Payment” या पर्यायावर जाण्या अगोदर अर्जातील नोंद केलेल्या माहितीची सत्यता पडताळून घ्यावी. कारण या पर्यायातील माहिती समाविष्ट (Submit)केल्या नंतर आपण मागील स्टेप मधील नोंदविल्या गेलेल्या माहिती मध्ये बदल करू शकत नाही.

७)अर्जाचे शुल्क / ऑनलाइन पेमेंटच्या सहाय्याने भरावे.

८)अर्जाचे शुल्क भरणा केलेला Transaction id / पावती व ऑनलाईन भरलेला अर्ज यांची प्रिंट काढून स्वतःजवळ सांभाळून ठेवावी.



No comments:

Post a Comment