ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात २९९५ विविध पदांची भरती - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Tuesday, 21 July 2020

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात २९९५ विविध पदांची भरती


ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात २९९५ विविध पदांची भरती.अंतिम दिनांक:- २८ जुलै २०२०
संस्था / विभागाचे नाव ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग
पदनाम वैद्यकिय अधिकारी,
परिचारीका,
प्रसाविका,
Intensivist,
Anasthetist,
Physician,
Store officer,
Medical Transcriptionist,
MGPS Technician,
Laboratory Technician
एकूण पदांची संख्या २९९५
अर्ज सुरु होण्याचा दिनांक १४ जुलै २०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ जुलै २०२०
अर्जाचे स्वरूप ऑनलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नियुक्तीचे ठिकाण ठाणे
परीक्षेचे ठिकाण ---
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
Intensivist ४५
--
Anasthetist १२०
--
Physician १२०
--
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - MBBS) १२० --
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - MBBS) ४८० --
वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक (Medical Officer - AYUSH) १२० --
वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक (Medical Officer - AYUSH) १२० --
परिचारीका (Nurses) १३८० --
प्रसाविका (Nurses ANM) ४५० --
Store Officer --
Medical Transcriptionist १२ --
MGPS Technician १२ --
Laboratory Technician १० --
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
Intensivist एमडी/एमबीबीएस २/३ वर्ष
 Anasthetist एमडी (Anasthesia) --
Physician एमडी २ वर्ष
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - MBBS) एमबीबीएस २ वर्ष आयसीयू
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - MBBS) एमबीबीएस १/२ वर्ष
वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक (Medical Officer - AYUSH) बीएएमएस ३ वर्ष आयसीयू
वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक (Medical Officer - AYUSH) बीएएमएस,बीयुएमएस,
बीएचएमएस
१/२ वर्ष
परिचारीका (Nurses) जीएनएम, बीएससी नर्सिंग १/२ वर्ष
प्रसाविका (Nurses ANM) एएनएम २/३ वर्ष
Store Officer कोणतीही पदवी २/३ वर्ष
Medical Transcriptionist मेडीकल ट्रान्सकिप्शन पदविका २/३ वर्ष
MGPS Technician MGPS Technician २/३ वर्ष
Laboratory Technician मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सूक्ष्मजीवशास्त्र पदवी ३ वर्ष
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
Intensivist
३८
४३
 Anasthetist
३८
४३
Physician
३८
४३
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - MBBS)
३८
४३
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - MBBS)
३८
४३
वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक (Medical Officer - AYUSH)
३८
४३
वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक (Medical Officer - AYUSH)
३८
४३
परिचारीका (Nurses)
३८
४३
प्रसाविका (Nurses ANM)
३८
४३
Store Officer
   ३८
४३
Medical Transcriptionist
३८
४३
MGPS Technician
३८
४३
Laboratory Technician
३८
४३
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
Open निःशुल्क
Obc निःशुल्क
Sc/St निःशुल्क
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा (जाहिरातीबद्दल अधिकची माहिती)

अर्ज भरण्याच्या तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सुचना:- 

१) www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर (ई-सुविधा सदराखाली) (भरती/Recruitment) येथे क्लिक केल्यावर ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध होईल.या लिंकवर अर्जदाराने क्लिक करावे.सदर जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केलेल्या पदाबाबतची यादी या ठिकाणी उपलब्ध होईल. 

२)ज्या पदासाठी अर्ज करावयाचा असेल त्या पदाच्या उजवीकडे असलेल्या "Apply" या ठिकाणी क्लिक करावे.त्यानंतर भ्रमणध्वनीची वैधता तपासण्यासाठी माहिती भरावी. "Send OTP" वर क्लिक केल्यावर अर्जदाराच्या भ्रमणध्वनीवर आलेला OTP क्रमांक नमुद करून अर्ज भरण्याची पुढील कार्यवाही करावी. 

३) अर्जदाराच्या भ्रमणध्वनीवर युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होईल,त्यास जतन करावे. 

४) पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता लिहावा,व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र,स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र/वर्ग अथवा तत्सम स्वरूपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा/संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये. 

५) उमेदवाराने आपला वैध ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.तसेच सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक अंतिम निकाल लागेपर्यंत कार्यरत असणे आवश्यक आहे.उमेदवाराने ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक चुकीचा अपूर्ण असल्यास,तसेच भ्रमणध्वनी क्रमांक रजिस्टर्ड (DND) असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिये दरम्यान पाठविल्या जाणाऱ्या सुचना,संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील,तसेच ई-मेल आयडी व भ्रमणध्वनीवर संदेशवहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना ठाणे महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.मुलाखतीबाबतचा संदेश ई-मेल/एस.एम.एस. द्वारे कळविण्यात येईल.एखाद्या उमेदवाराचा वैध ई-मेल आयडी नसल्यास त्याने अर्ज करण्यापूर्वी स्वतःचा ई-मेल आयडी तयार करणे आवश्यक आहे. 

६) उमेदवार शासकीय/निमशासकीय सेवेत कार्यरत असल्यास त्यांनी कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

७) उमेदवाराने अर्ज सादर करताना न्यायप्रविष्ठ प्रकरण,फोजदारी,शिस्तभंगविषयक प्रकरण वा तत्सम कारवाईसंबंधीची माहिती देणे आवश्यक आहे,सदर माहिती न दिल्यास उमेदवाराची सेवा कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. 

८) उमेदवारांस ज्या पदाकरीता अर्ज करावयाचा आहे त्या पदांची जाहिरातीमध्ये नमुद केलेली शैक्षणिक अर्हता,अनुभव धारण करीत असल्याची व अन्य आवश्यक कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सादर करणे आवश्यक आहे. 

९) आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्याशिवाय उमेदवार निवडीस पात्र राहणार नाही.केवळ मुलाखत दिल्यामुळे उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही त्यामुळे उमेदवारांनी संबंधीत पदांच्या पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज करावा. 

१०) उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सबमिट (SUBMIT) केल्यावर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. 

११) अर्जात हेतुपुरस्सर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठविलेल्या दाखल्यांच्या प्रतीतील नोंदीत अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले वा बनावट दाखले सादर करणे, वशिला लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे,निवडींना अनर्ह ठरविणे यापैकी प्रकरणपरत्वे योग्य त्या शिक्षा करण्याचा तसेच प्रचलित कायदा व नियमाचे अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार निवड समितीस राहतील.तसेच विहीत केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणारा अथवा गैरवर्तणुक करणारा उमेदवार कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल. 

१२) पूर्णतः माहिती भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्यावी.प्रिंट काढलेल्या अर्जाची प्रत जपून ठेवावी.अर्जाची प्रिंट मुलाखतीच्या वेळी तसेच कागदपत्र तपासणीच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे. 

१३) संपूर्णपणे पदभरती संदर्भातील सर्व माहिती व त्या अनुषंगाने होणाऱ्या बदला बाबतची सर्व माहिती केवळ कार्यालयीन संकेतस्थळावर उलब्ध होईल.या व्यतिरिक्त कोणत्याही माध्यमाद्वारे माहिती दिली जाणार नाही.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

१४) उमेदवाराने अर्ज केला अथवा विहीत अर्हता धारण केली म्हणजे मुलाखतीस बोलाविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. 

१५) ऑनलाईन अर्ज भरताना शेवटच्या दिवशी एकाच वेळी अनेक ठिकाणाहून इच्छुक उमेदवार अर्ज भरत राहिले तर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही,तरी उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची अंतिम कालावधीची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.याबाबत उमेदवारास अर्ज सादर करण्यासाठी कोणतीही वाढीव मुदत देण्यात येणार नाही.तसेच यासंबंधीत कोणतीही तक्रार करता येणार नाही.अशा तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.No comments:

Post a Comment